तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

देवरी: (प्रहार टाईम्स): तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे देवरी तालुक्यातील फुटाना येथे थाटात उद्घाटन पार पडले असून सविता पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया यांच्या हस्ते उद्घाटनीय कार्यक्रम पार पडले असून यावेळी अंबिका बंजार सभापती देवरी अध्यक्ष, कार्यक्रमाचे ध्वजारोहक उषाताई शहारे जिप सदस्या, उपसभापती अनिल बिसेन , कल्पना वालोदे जिप सदस्या, श्री. सिंगनजुडे गटविकास अधिकारी, महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख , सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

जिप शाळेच्या सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी अटल क्रीडा महोत्सवात विविक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, तालुकास्तरीय महोत्सव १७ डिसें ते २० डिसें पर्यंत साजरा होणार असून विद्यार्थी आपले कला कौशल्य साजरे करणार आहेत.

Share