खालसा प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिले एकजुटीचे संदेश
देवरीत खालसा प्रीमियर लीग थाटात संपन्न, विजेते ठरले सुखनूर वॉरियस
देवरी (प्रहार टाईम्स) : गुरुद्वारा गुरूसिंह सभा देवरी आणि खालसा सेवा दल यांच्या संकल्पनेतून देवरी येथे खालसा प्रीमियर लीगचा (क्रिकेट)बक्षित वितरण सोहळा थाटात संपन्न झाला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील , राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कलबीरसिंह कलशी, परमजितसिंह भाटिया अध्यक्ष, गुरुद्वारा समिती, सतविंदरसिंह भाटिया सचिव गुरुद्वारा समिती देवरी, ऋषी भाटिया अध्यक्ष खालसा सेवा दल, शीख समाजाचे प्रमुख पदाधिकारी, देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजातील सर्व महिला व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील एकता कायम राहावी, समाजातील सर्व नागरिकांना खेळाच्या माध्यमातून मनोरंजन मिळावे , खेळाडूवृत्ती टिकावी या उद्देशाने खालसा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते यामधे सुखनूर वॉरियर संघ ( मिंकू भाटिया ) विजेता ठरले असून राज यॉयल्स संघ ( डिंपल भाटिया) उपविजेता ठरले. सदर सामन्यामध्ये मिंकू भाटिया मन ऑफ द सिरीज ठरले असून संदीप भाटिया यांचे कडून टीव्ही सप्रेम भेट देण्यात आली तसेच मुलांच्या गटात सरताज भाटिया याला विंकल साइकल यांचे कडून सायकल भेट देण्यात आली.
सदर लीग मधे रवी काळे आणि पोकेश मुलतानी यांनी मुख्य निर्णयकांची भूमिका बजावली असून त्यांचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन इंद्रजितसिंह भाटिया यांनी केले असून कॉमेंट्री जस्मितसिंह भाटिया यांनी केली. खालसा प्रीमियर लीग ला यशस्वी करण्यासाठी जॉनी भाटिया , सोनू भाटिया, आदर्श भाटिया , अगम भाटिया यांनी मोलाची भूमिका बजावली असून सुनियोजित व्यवस्थापन आणि नियोजन शैंकी भाटिया यांनी केले. अतिशय थाटात सदर सोहळा पार पडला असून अतिथीनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.