जिल्ह्यात ११ महिन्यांत २८ खून, धक्कादायक आकडे

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन

गोंदिया: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम असताना अनेकदा काही असामाजिक तत्वांकडून त्याचा भंग केला जातो. क्षुल्लक कारणांवरून जिल्ह्यात खूनाच्या घटना घडल्या आहेत. यंदाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २८ खून झाल्याची नोंद आहे. उल्लेखनिय म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा खुनांचा आकडा अधिक आहे. गोंदिया शहरात सर्वाधीक खुनाच्या घटना घडल्या आहेत. शहर पोलिसांनी घटना उघडकीस आणून आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत.

जिल्ह्यात झालेल्या  खुनात आपसी जुने वैमनस्य, क्षणिक वाद, क्षणिक राग, प्रेमाचा त्रिकोण, जागेचा वाद अशी कारणे समोर आली आहेत. खुनाच्या घटनांत वाढ झाली असली, तरी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. खुनाच्या २८ गुन्ह्यांतील सर्वच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या काही घटनांमध्ये अल्पवयीन आरोपींचाही सहभाग आहे. काही ठिकाणी तलावर, बंदूक, चाकू, धारदार शस्त्राच्या माध्यमातून खून करण्यात आले.

जिल्ह्यात  पाच वर्षातील खून आकडेवारी २०२० – ३३, २०२१ – ३०, २०२२ – २०, २०२३ -२८, २०२४ -२८

Share