मंत्रीपद न मिळाल्याने नाराज भोंडेकरांनी दिला पदांचा राजीनामा

Bhandara : मंत्री मंडळात स्थान मिळणार अशी महत्वकांक्षा असताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर यांना निवडणुकीपूर्वी मंत्रिपदाचे आश्वासन दिले मात्र त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा हिरमोड झाला. नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करीत त्यांनी शिवसेनेतील विविध पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शपथविधी होण्यापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ मंत्रिपदं मिळाली आहेत. एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता मंत्री मंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेने त्यांना मंत्री न केल्यामुळे पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयकाचा पद त्यांच्याकडे होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामाही त्यांनी दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.

Share