स्थानिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही! जिल्हाच्या नशिबी पुन्हा ‘झेंडा मंत्री’
गेल्या ५ वर्षात गोंदिया जिल्ह्याला ५ पालकमंत्री
गोंदिया : जिल्ह्याच्या नशिबी आगामी ५ वर्ष पुन्हा पालकमंत्रीच्या स्वरुपात झेंडा मंत्रीच लाभणार, हे मंत्री मंडळाच्या विस्तारावरून शिक्का मोर्तब झाले आहे. त्यामुळे राज्य मंत्री मंडळाच्या सरकारात गोंदिया जिल्ह्याला स्थान मिळेल आणि हक्काचे स्थानिक पालकमंत्री मिळेल, ही आशाही आता निराशेत बदलली आहे. मंत्री मंडळ विस्ताराकडे गोंदिया जिल्हावासीयांचे उत्साहपुर्ण आज लक्ष लागले होते. मात्र जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने जनप्रतिनिधी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा उत्साह मावळला. गोंदिया जिल्ह्यातील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मते देवून जनादेश दिला. दरम्यान महायुतीची सरकार स्थापित झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्याला मंत्रालयात स्थान मिळेल, अशी आशा बाळगली जात होती. विशेतः राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाकडून आमदार इंजि. राजकुमार बडोले किंवा विजयाची हॅट्रिक करणारे भापचे आमदार विजय रहांगडाले यांची मंत्रीपर्दी वणी लागले, असे माणले जात होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे मंत्रीमंडळाच्या विस्तार कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. आज सकाळपासूनच मंत्री पदाच्या यादीत आपल्या जिल्ह्याच्या आमदारांची नावे आहेत की नाही, अशी विचारपूसही केली जात होती. दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या मंत्री मंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते, मात्र जिल्ह्याच्या पदरी मंत्रालयाला घेवून निराशाच आली. गोंदिया जिल्ह्याला राज्याच्या मंत्री मंडळात स्थान देण्यात आले नाही, त्यामुळे पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या नशिबी पालकमंत्रीच्या स्वरुपात झेंडा मंत्रीच लाभणार, हे सिद्ध झाले असून नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. उल्लेखनीय असे की, गेल्या ५ वर्षात गोंदिया जिल्ह्याला ५ पालकमंत्री लाभले होते. पाचही पालकमंत्री जिल्हा बाहेरचे होते. जिल्हा बाहेरच्या मंत्र्यांचे पालकत्व फक्त नावापुरतेच लाभत असते. पालकमंत्री कार्यक्रमा पुर्ते जिल्ह्यात दाखल होता, आणि निघून जातात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्र्यांना झेंडा मंत्री म्हणून संबोधले जात आहेत. आगामी काळात जिल्ह्याला मिळणारे पालकमंत्री जरी परजिल्ह्यातील असले तरी, पालकत्वावर लागलेला दाग पुसून काढणार, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.