जिपच्या ४०७०६ विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची आस
शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर शासन, प्रशासनाच्या भुमिकेवर संताप
गोंदिया : मोफत गणवेश योजनेतंर्गत राज्य शासनाने जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा केली होती. शैक्षणिक वर्ष सुरू होवून संपण्याच्या मार्गावर आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ४० हजार ७०६ विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे शासनाची योजना फसवी आहे का? असा प्रश्न संतप्त पालकांकडून उपस्थित केला जात आहे. गणवेश मिळणार, या आशेवर चिमुकल्यांना अर्धे शैक्षणिक वर्ष काढून टाकले आहे. पण अद्यापही गणवेश केव्हा मिळणार, या शाश्वती राहिली नसल्याने योजनेच्या नावावर विद्यार्थ्यांची थट्टा केली जात आहे.
राज्य शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समान गणवेश असावा, यासाठी मोफत गणवेश योजना सुरू केली. या योजनेतंर्गत गणवेश निर्धारीत करून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे जाहिर केले. यासाठी संबंधितांना सुचनाही देण्यात आल्यात. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांना लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु, अर्धा शैक्षणिक सत्र लोटूनही ४० हजार ७०६ विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेला घेवून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. शासन गणवेश देणार, यासाठी पालकांनी अनेक पाल्यांसाठी गणवेश खरेदी केला नाही. आज ना उद्या करता-करता संपूर्ण शैक्षणिक वर्ष लोटत असतानाही गणवेश केव्हा मिळणार, याचा अंदाज राहिला नाही. यामुळे पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. योजनेच्या नावावर शासन
तालुकानिहाय स्थिती
जिल्ह्यातील ७१ हजार ३२४ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले होते. यातील ३८ हजार ६१८ वितरण करण्यात आले तर ४० हजार ७०६ विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षा आहे. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८४८० पैकी ६८८५ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले तर १५९५ विद्यार्थी वंचित आहेत. आमगांव तालुक्यातील ८ हजार ३६४ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहे. देवरी तालुक्यातील ६९३६ पैकी ५५७३ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला तर १३६२ विद्यार्थी वंचित, गोंदिया १९९७६ विद्यार्थ्यापैकी ४५७४ गणवेश प्राप्त तर १५४०२ विद्यार्थ्यांना गणवेशची प्रतिक्षा, गोरेगांव तालुक्यातील ८४९९ विद्यार्थ्यांपैकी २५७८ गणवेश प्राप्त तर ५९२१ विद्यार्थ्यांना गणवेशची प्रतिक्षा, सालेकसा तालुक्यातील ६९६९ विद्यार्थ्यांपैकी ४९६९ विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त तर २ हजार विद्यार्थी वंचित, सड़क अर्जुनी तालुक्यातील ७८८४ विद्यार्थ्यांपैकी २५० विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले तर उर्वरित ७६३४ विद्यार्थ्यांना गणवेशची प्रतिक्षा व तिरोड़ा तालुक्यातील १२२२४ विद्यार्थ्यांपैकी ५४३३ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले तर ६७१९ विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.
गरीबांची थट्टा
३८६१८ विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ३८ हजार ६१८ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे. यामध्ये तर उर्वरित अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेले विद्यार्थी यंदा गणवेशापासून वंचित राहणार, असेच दिसून येत आहे. गणवेशासाठी शिक्षकांकडे विचारणा केली जात आहे. परंतु, वरिष्ठ स्तरावरुन प्राप्त होताच, वितरण होणार असल्याचे शिक्षक सांगत आहेत.