शिक्षणाचे कर्तबगार खरे फुले दाम्पत्येच आहेत- डॉ. सुकेशिनी बोरकर यांचे प्रतिपादन

बोडगांव देवी: महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतिहासात महिला शिक्षकाचे अलौकीक कार्य राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आहेत. महिलांना सन्मानाचे स्थान संविधानाच्या बळावरच आणि फूले दाम्पत्य यांचेच उपकार आहेत हे विसरता कामा नये. म्हणून शिक्षणाचे कर्तबगार खरे फुले दाम्पत्येच आहेत. प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी, नागपूरच्या प्रा. डॉ.सुकेशिनी बोरकर यांनी केले. त्या नाटकाचे उद्घाटक म्हणून बोलत होत्या.यावेळी मंचावर सभापती यशवंत परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. सदस्य श्रीकांत घाटबांधे, घनश्याम धामट, अतुल बंसोड, रत्नदीप दहिवले, रविंद्र खोटेले, शिला उईके, चद्रकला ठवरे, परेश उजवणे, दिलवर रामटेके, दादा संग्रामे, हरिदास कुंभरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे फ्रेन्डस नाट्य कला मंडळ येरंडी/देवलगांव हे मंडई व नाट्य प्रयोग आयोजित करीत असते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपत आहे. यावर्षी सदर गावातील रंगमंचावरील अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरनाचा ५० वा वर्षे आहे. नाट्यप्रयोगाचे संचालन किशोर शंभरकर यांनी करून प्रास्ताविक दहिवले केले तर आभार उमेश बोरकर यांनी मानले. नाट्य मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

Share