राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

देवरी: एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) महाराष्ट्र राज्य अंतर्गत बोरगाव बाजार, ता. देवरी जि. गोदिया या ठिकाणी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध EMRS शाळांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अक्कलकुवा (नंदुरबार) पिंप्री सद्रोदीन (नाशिक) बोरगांव बाजार (गोंदिया) या EMRS शाळांनी विविध गटांत प्रथम क्रमांक मिळवित रायपुर (छत्तीसगढ) या ठिकाणी होणा-या EMRS राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहे. सदर स्पर्धेत EMRS बोरगांव बाजार शाळेतील कु. प्रणाली देवेंद्रकुमार राऊत (U-19 Girls) या गटात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेस पात्र झाली आहे. याशिवाय पूर्वा तुळसिदास पुसाम (12 वी), संजना फाफनवाडे (8 वी), गणराज सयाम (8 वी) यांनी विविध गटात ‘द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धेत श्याम अग्रवाल व प्रविण पाणतावने यांनी पंच म्हणून भूमिका निभावली. सदर स्पर्धेच्या उ‌द्घाटनप्रसंगी एम. एस. बलवीर (प्राचार्य, जवाहर नवोदय विदयालय, नवेगाव बांध) गोवर्धन खेडकर (मुख्याध्यापक, शासकिय कन्या आश्रमशाळा बोरगांव बाजार) आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी ए.आ. विकास प्रकल्प देवरी, तुषार काळेल, पोलीस उप निरीक्षक, चिचगड आणि गणेश कुमार तोडकर, प्राचार्य EMRS बोरगाव बाजार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Share