‘नोटा’चा कुणाला होणार ‘तोटा’, मागील निवडणुकीत 7144 मतदारांची नोटा ला पसंती
देवरी :2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 7 हजार 144 मतदारांनी नोटाला पसंती दाखवून 47 उमेदवारांना नाकारल्याचे दिसले होते. त्यामुळे यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता असून त्याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल? हे बघण्यासारखे असणार आहे. मतदान घेणे, एकूण झालेले मतदान, मतदान संपल्यानंतर मतपेटी सिलबंद करणे व सर्वात शेवटी निवडणुकीचा निकाल जाहीर करणे अशी विविध कामे केवळ एक बटण करते. ही कामे नियंत्रण विभागाकडे आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठी राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारही जोरदार प्रचार करुन आपणच क्षेत्राचा विकास कसा साधू शकतो, हे पटवून देतो. असे असतानाही मतदारांना निवडणूक आयोगाने दिलेला ‘नोटा’चा वापर करतो. एकही उमेदवार पसंत नसल्यास ईव्हीएम मशिनच्या शेवटी असलेले नोटाचे बटन दाबून नकारात्मक मतदान करण्याची सुविधा मतदारांना प्राप्त आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यात नोटाचा वापर करणार्या मतदारांनामध्ये वाढ झालेली दिसून येते. मात्र याचा फटका प्रामुख्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बसतो. मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारंस्धातील 7 हजार 144 मतदारांना एकही मतदार आवडला नसून नोटाला पसंती दिली होती. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात नोटाचा सर्वाधिक वापर केला गेला या मतदारसंघातील 2 हजार 27 मतदारांनी नोटाचे बटन दाबले. दुसर्या क्रमांकावर गोंदिया मतदारसंघ होता या मतदारसंघात 1 हजार 852 मतदारांनी मतदारांना नाकारले. तर सर्वात कमी नोटाचा वापर आमगाव मतदारसंघात झाला या मतदारसंघात 1 हजार 379 मतदारांनी नोटाला पसंती दिली. यंदा विधानसभा निवडणुकीत नोटाचा वापर करणार्या मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्याचा फटका कोणकोणत्या मतदारसंघातील उमेदवाराला सहन करावा लागणार हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.