नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या सुरू होणार

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अंतिम मुदत 29 ऑक्टोबर 2024 असून उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत नामनिर्देशपत्र दाखल करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करतांना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 29 ऑक्टोबर 2024 ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 30 ऑक्टोबर 2024 ला नामनिर्देशपत्राची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात 63-अर्जुनी मोरगाव64-तिरोडा65 गोंदिया66 आमगाव असे 4 विधानसभा क्षेत्र आहेत. दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंद झालेले एकूण 11 लाख 21 हजार 460 मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 5 लाख 52 हजार 181तर स्त्री मतदार 5 लाख 69 हजार 269 व इतर 10 मतदारांचा समावेश आहेत. जिल्ह्यात ईव्हीएम,व्हीव्हीपॅडसीयु 1567बीयु 2852व्हीव्हीपॅड 1695 व एकूण मतदान केंद्राची संख्या 1285 आहे.मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Share