भाजपच्या पहिल्या यादीत ‘संजय पुराम’ यांचा ‘कमळ’ निश्चित

देवरी– विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामधे पहिल्या यादीत आमगाव- ६६ विधानसभेतून माजी आमदार संजय पुराम यांचा कमळ निश्चित झाला असून यांच्यासह ९९ शिलेदारांच ‘कमळ’ पक्का झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कामठीमधून वर्णी लागली आहे.

2014 संजय हनवंतराव पुराम यांनी 62590 मते मिळवून काँग्रेस च्या रामरतन बापू राऊत (44295)यांचा दणदणीत पराभव करीत पहिल्यांदा विधानसभेत एंट्री मारली.

2019 साली झालेल्या अटातटीच्या विधानसभा निवडणुकीत आमगाव-देवरी मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा ८ हजार मताने पराभव केला होता. या निवडणुकीत आमदार कोरोटे यांना 88 हजार 265 इतकी मत मिळाली होती. तर भाजपचे संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली होती. हा काळ संजय पुराम यांच्या साठी आत्मचिंतनाचा ठरला. त्यांनी आमदार नसतांनाही निरंतर समाजकार्य आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अडचणी सोडविण्याचे कार्य सुरू ठेवले त्याचे फळ आज त्यांना 2024 च्या भाजपच्या पहिल्या यादीत मिळाले असून विधानसभेतील युवावर्गाचे आदर्श संजू भाऊ यांना पुन्हा संधी मिळाली आहे. यावेळी संजय पुराम यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रत्यक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Share