आमगाव देवरी विभानसभेत 3 कोटी 91लाख किमतीचे सोने जप्त
देवरी ⚫️ आचारसहिंता लागताच 66 – आमगाव विधानसभा मतदारसंघातील आमगाव तालुक्यातील FST आणि SST पथक यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत दि. १९ ला आमगांव- लांजी बॉर्डर येथून वाहन क्र.CG04N2876 मधून 7892 gm अंदाजे 3 कोटी 91लाख किमतीचे सोने जप्त करण्यात आले. तहसीलदार आमगाव आणि ठाणेदार पो.स्टे.आमगाव यांचे निगराणीत जप्त मुद्देमालाचा पो.स्टे.आमगाव येथे पंचनामा करण्यात आला. जप्त मुद्देमाल सीलबंद करून पोलीस संरक्षणात जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांचे अभिरक्षेतील सुरक्षा कक्षेत ठेवण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी,गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच ESMS मध्ये तक्रार नोंदवून सदर मुद्देमालाची तपासणी करून पुढील कारवाई भारत निवडणूक आयोग यांच्या निदर्शनानुसार करण्यात येईल.