पोलिसांच्या प्रयत्नांतून शाळेचा कायापालट

दादालोरा खिडकी योजनेंतर्गत नूतनीकरणाला सुरुवातः ठाणेदार तुषार काळे यांचा पुढाकार

देवरी : गोंदिया जिल्ह्यात आजही काही जिल्हा परिषद शाळांची व इतर शासकीय शाळेची दयनीय अवस्था निदर्शनास येते. मात्र देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार तुषार काळेल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाच्या दादालोरा खिडकी योजनेंतर्गत शाळा नूतनीकरणाच्या कार्याला सुरुवात केली आहे. इस्तारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालटदेखील पोलिसांच्या प्रयत्नांतून झाला आहे. इस्तारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीची दुरवस्था झाली होती. त्यामुळेपालक आपल्या पाल्यांना या शाळेत न पाठविता दूरवरच्या शाळेत दाखल करीत होते. हा विषय चिचगड पोलिसांना माहिती पडला. पोलिसांनी तातडीने दखल घेत दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत इस्तारी येथील जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला. दादालोरा खिडकी योजनेंतर्गत पोलिस विभागाच्या या उपक्रमावर पालकांनी विश्वास दाखविला असून जिल्हा परिषद शाळा आदर्श बनविण्यासाठी

पोलिस प्रशासन एकत्र आले. पोलिस विभागाच्या या कार्याला गावकऱ्यांनीही साथ दिली. या कार्यात गावकरी, शिक्षक व माऊली फाउंडेशन नागपूर यांनीही मोलाचा वाटा उचलला. त्या माध्यमातून शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. शाळेची रंगरंगोटी, भिंतीवरील बोलकी चित्र विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना दिसत आहे. शाळेत विविध रंगांची फुलझाडे, शाळेतील विद्याथ्यर्थ्यांना खेळाच्या सुविधा, स्वतंत्र अभ्यासिका, कॉम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांसाठी बँक, मुलभूत सोयीसुविधा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या भौतिक सुविधांची व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले. या शाळेतील विद्यार्थीर क्रीडा स्पर्धेत आपला ठसा उमटवित असून जिल्हा क्रीडा स्पर्धेतील खो-खो, कबड्डीसारख्या खेळांमध्येही येथील विद्यार्थी आता क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत आपली ओळख निर्माण करतील, अशी आशा पोलिस विभागातर्फ व्यक्त करण्यात आली आहे.

Share