जिल्हात निःशुल्क डायलेसिस सुविधा

निःशुल्क डायलेसिस सुविधेचा लाभ घ्या: डॉ. सुवर्णा हुबेकर

गोंदिया 🔺आजच्या धकधकीच्या जीवनशैलीमुळे विविध गंभीर आजारांमुळे मुत्रपिंड निकामी (किडनी फेल) होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मधुमेह, हायपर टेन्शन आदि रोगाच्या गुंतागुंतीमुळे अगदी तरुण वयात किडनी फेलमुळे रुग्णाला डायालिसिसची गरज भासू लागली आहे. खाजगी रुग्णालयात हे उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने शासनाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात निःशुल्क डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

राज्य सरकारने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे, प्रधानमंत्री डायलिसिस योजना अंतर्गत ज्या किडनी फेल रुग्णाना डायालेसीसची गरज आहे त्यांनी रुग्णालयाच्या डे केयेर सेंटरला भेट देऊन निःशुल्क डायलेसिस सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी तथा केंद्राच्या प्रभारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे. पीएम डायलिसिस डे केयेर सेंटरमध्ये 6 बेडची आद्यवत व्यवस्था केली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते रात्री 9 या सत्रात डायलेसिस कक्षाचे कामकाज चालते. यासाठी प्रशिक्षित 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा व 6 प्रशिक्षण दिलेल्या स्टाफ नर्सेसची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएचएस अंतर्गत डॉ. मयंक जैतवार व डॉ. श्रुती चौधरी सेवा देत आहेत. डायलिसिस सेंटरच्या तांत्रिक प्रबंधनात वैद्यकीय महाविद्यालयाचे श्रीचंद कटरे सहकार्य करीत आहेत. जिल्ह्यासह सिमावरती मध्यप्रदेश व छतीसगड राज्यातील गरजू रुग्णाला डायलेसिस सेंटर जीवनदायी ठरले असल्याचे आयपीएचएस जिल्हा समन्यवक डॉ. सुवर्णरेखा उपाध्याय यांनी सांगीतले. डायलेसिस सेेंटरला 85 रुग्णांची नोंदणी झाली आहे. महिन्याला 650 ते 700 डायलेसिस होत आहेत, कावीळग‘स्त रुग्णाला डायलेसिस देण्याकरिता स्वतंत्र यंत्र उपलब्ध आहे. महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णाला मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येते असल्याचे जिल्हा समनव्ययक डॉ. जयंती पटले यांनी सांगितले.

Share