वृक्षारोपनाने माजी आ. संजय पुराम यांचा वाढदिवस साजरा

देवरी : माजी आमदार संजय पुराम यांचा 51 वा वाढदिवस बुधवार, ऑगस्ट रोजी देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढदिवस रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपन करून उत्साहात साजरा करण्यात आला.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती प्रमोद संगीडवार, उपसभापती विजयसिंह कच्छप, संचालक आसाराम पालीवाल, सुकचंद राऊत, यादोराव पंचमवार, श्रीकृष्ण हुकरे, कमल येरणे, खेमराज डोये, गणेश भेलावे, अनिलकुमार बिसेन, शिवदर्शन भांडारकर, धनराज कोरोंडे, अंशुल अग्रवाल, दीपक अग्रवाल, मारोती खंडारे, सचिव लोकेश सोनुने, नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, माजी अध्यक्ष अनिलकुमार येरणे, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख विरेंद्र अंजनकर, पंस सभापती अंबिका बंजार, भाजपायुमोचे छोटू भाटिया आणि भाजप, युवा मोर्चा व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच देवरी पत्रकार संघाच्या भवनात माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवस पत्रकारांनी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड. प्रशांत संगीडवार, नरेंद्र चंचल, जुबीन खान, देवेंद्र सेलोकर, मलेवार, सुरेश चन्ने, सुनील चोपकर, नंदुप्रसाद शर्मा यांच्यासह अनेक गणमान्य नागरीक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share