देवरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या शासनजमा
■ राशन व केरोसीन वितरण दुकानदार समिती देवरीचे तहसीलदारांना निवेदन
देवरी ◾️ई-पॉ मशीन द्वारे धान्य वितरण करताना येणान्या अडचणी ५ ऑगस्टपर्यंत दूर कराव्या, अन्यथा ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा राज्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने २५ जुलै रोजी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या ।कार्यालयात झालेल्या बैठकीत संबधीत अधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र या विषयी कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर समितीच्या वतीने सोमवार (ता.५ ऑगस्ट) रोजी तालुक्यातील एकूण ७९ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन देवरीच्या तहसील कार्यालयात जमा करून तहसीलदार यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
सादर केलेल्या निवेदनात राज्यात साधारण ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणीकीकरणा नंतर २०१८ पासून ई-पास मशीनद्वारे धान्य वितरण करीत आहे. त्यानंतर कालबाह्य झालेल्या टू जी ई-पॉस मशीन बदलून दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक फोर जी सपोर्टेड मशीन देण्यात आल्या. परंतु, नवीन ई-पॉस मशीनपेक्षा टू जी मशीन चांगली होती, अशी म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपासून ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सव्र्व्हर डाऊन येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरण करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिका धारकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. दुकानदार
दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असूनही वितरण करू शकत नाही. याबाब तालुका स्तरापासून राज्यस्तरावर अनेकदा तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना झालेल्या नाही. त्यामुळे पुढील काळात स्वस्त धान्य दुकानदार आपापल्या तहसील कार्यालयात ई-पॉस मशीन जमा करतील, असा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात २५ जुलै रोजी प्रधान सचिवांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. परिणामी, ५ ऑगस्ट रोजी ई-पॉस मशीन आपापल्या तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार देवरी तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार समितीच्या वतीने एकूण ७९ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन तहसीलदारांकडे सोपवून आपल्या मागणीचे। निवेदन दिले.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात समितीचे सचिव दिपक शर्मा, अब्दुल रज्जाक पठान,सुशिल जैन,दिलीप राऊत ,राजेश गहाणे, सुरेश साखरे,सुरेश भोगांडे, मधुकर साखरे,रविकांत बडवाईक, प्रेमानंद गोवर्धन,शालूताई उईके,प्रतिमा देशपांडे आदींचा समावेश होता.