सात वर्षांपासून रखडली संमग्र कर्मचार्‍यांची वेतनवाढ

20 वर्षांत चारच वेतनवाढ

गोंदिया ◾️सर्व शिक्षा अभियानातंर्गत 1994 मध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी सेवा नियमावली तयार करण्यात आली. त्यात 10 टक्के मानधन वाढ करण्याचा उल्लेख केला होता. मात्र आतापर्यंत चार वेळा माधन वाढ केली आहे. 2017-18 पासून मानधनात वाढ केली नाही. त्यात गेल्या 20 वर्षात केवळ चारच वेळा वेतनवाढ झाली. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांसमोर आर्थिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. 20 वर्षापूर्वी सर्व शिक्षा अभियानात 14 प्रकारच्या पदांची जाहीरात देऊन भरती करण्यात आली होती. त्यात सहायक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा समन्वयक, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, संगणक प्रोग्रामर, एमआयएस को-ऑर्डिनेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम असिस्टंट, वरिष्ठ लेखा लिपीक, विषय साधनव्यक्ती, समावेषित शिक्षण विशेषज्ञ, विशेष शिक्षक, वाहनचालक व परिचर आदी पदांचा समावेश होता. राज्यात अशी एकूण 6030 पदांची भरती बिंदू नामावलीनुसार, ज्याप्रमाणे सरळ सेवा भरतीची जाहिरात देऊन केली जाते, तशी करण्यात आली होती. जिल्ह्यात 140 पदे कार्यरत आहेत. त्यापैकी 2105 पासून विषय साधनव्यक्ती, समावेशिषत विशेषज्ञ व विशेष शिक्षक हे गुणवत्तेच्या कार्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे वर्ग करण्यात आले आहेत. 18 ते 20 वर्षाचा कालावधी होऊनही केवळ चारच वेतन वाढ तसेच शासन सेवेत कायम न झाल्याने या कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये शासनविरोधात असंतोष वाढत आहे.

Share