महाविकास आघाडीने केला आमदार अभिजित वंजारी यांचा नागरी सत्कार
प्रहार टाईम्स|भुपेन्द्र मस्के
चिचगड 24: महाविकास आघाडी देवरी तालुका चिचगड जिल्हा परिषद क्षेत्र चिचगडच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला.
संत गुलाबबाबा मंदिर परिसरात गोंदिया जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव किरसान, माजी जि.प अध्यक्ष टोलसिंगभाऊ पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश ताराम, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, काँग्रेस नेते अमर वऱ्हाडे, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मोतीलाल पिहदे आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनिर्वाचित विधान परिषद आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती आमदार अभिजित वंजारी, अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव किरसान ,उद्घघाटक माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंगभाऊ पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रमेश ताराम, सी.के बिसेन, गोपाल तिवारी, इंदल अरकरा, फगणुजी कल्लो, काँग्रेस नेते अमर वऱ्हाडे, प्रल्हाद भोयर, विनोद जैन, योगेंद्र भगत घाशिलाल कटकवार, उषा शहारे, माधुरी कुंभरे, प्रशांत संगिडवार, भुवन नरवरे, दिवाकर मुलकलवार, राजू भक्ता, नरेंद्र सांडिल, नर्मदाप्रसाद शर्मा, उदापुरे गुरूजी, रंजित कासम, सावन राऊत, ओमराज बहेकार, संरपच मिरा कुंजाम, कल्पना गोस्वामी, धनश्री गंगासागर सदरू बंदेअली, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बिरसा मुंडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ॲड. अभिजित वंजारी यांनी गेल्या ५८ वर्षाचा इतिहास या निवडणुकीत मोडण्यात आल्याचे सांगितले.
शेतकरी, कामगार, पदवीधर यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवीन, दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करील, विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या विकासाची जबाबदारी माझी असेल, असेही याप्रसंगी ते म्हणाले.
निवडणूक कशी जिंकायची हे ॲड. वंजारी यांनी आपल्या विजयाद्वारे दाखवून दिल्याचे कार्यक्रमाचे उद्घघाटक टोलसिंगभाऊ पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मोतीलाल पिहदे तर संचालन भुपेन्द्र मस्के व आभार उत्तम साखरे यांनी केले कार्यक्रमाला पदविधर ,नागरिक व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.