देवरी असुरक्षित 🚨 दिवसाढवळ्या दुचाकीतून १ लाख रुपये उडविले..!

◼️ दुर्गा चौक परिसरातील घटना

◼️चोरांना देवरी पोलिसांचा धाक चं नाही ??

देवरी ◼️ सध्या देवरी शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असून देवरीवाशी असुरक्षित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यात चोऱ्यांची शृंखला पार पाडली त्यातच आज दि. १० ला दिवसाढवळ्या स्थानिक दुर्गा चौकातील संतोष बर्तन अँड क्रेकरी या दुकानाच्या परिसरात आलेल्या नागरिकांच्या दुचाकीतून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना सकाळी ११.१५ दरम्यान समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, हरीश सांगोडे वय ४१ रा. चिचगड हे आपल्या व्यावसायिक कामासाठी स्थानिक अॅक्सिस बँक इथून रुपये एक लाखाची रक्कम काढली व घरघुती स्वयंपाक कामाकरिता नवीन कुकर खरेदी करण्यासाठी स्थानिक दुर्गा चौक येथे संतोष बर्तन अँड क्रेकरी या दुकानात असतांनाच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या प्लेटिना या कंपनीच्या दुचाकी क्रमांक सीजी ०४ एन एम ३७१३ दुचाकीला असलेल्या बॅगमधून लांपास केले. या घटनेमुळे संपूर्ण देवरी परिसरात दहशत माजली आहे. घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीचा देवरी पोलिसांकडून तपास सुरू आहे मात्र चोरीच्या आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनामुळे देवरी शहर चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. पोलिसांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या महत्वाच्या व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात आवश्यक असलेल्या कामाकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मजल वाढत असल्याची भावना सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. “

Share