ट्रकची बैलगाडीला धडक, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

तिरोडा : अज्ञात ट्रकने बैलगाडीला मागेहून धडक दिली. यात बैलबंडीवरील एकाचा मृत्यू तर दुसरा इसम जखमी झाला. चुुन्नीलाल हरिणखेडे असे मृतकाचे तर रामलाल पटले असे जखमीचे नाव आहे. हा अपघात आज शनिवार 4 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास रामटेक-तिरोडा-गोंदिया मार्गावर पांजरा-मुंडीकोटा गावादरम्यान घडला.

पांजरा येथील रामलाल पटले व चुन्नीलाल हरीणखेडे हे दोघेही शेत शिवारात धानाची तनस आणण्यासाठी बैलगाडीने जात असताना तिरोडाकडून तुमसरकडे जाणार्‍या अज्ञात ट्रकने बैलबंडीला मागेहून जोरदार धडक दिली. यात रामलाल पटले यांना किरकोळ दुखापत झाली. तर चुन्नीलाल हरीणखेडे हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी भंडारा येथे नेण्यात आले. प्रकृति गंभिर असल्याने डॉक्टरांनी नागपूरला नेझयाचा सल्ला दिला. नागपूर येथे नेत असताना बेला जवळ चुन्नीलाल हरीणखेडे यांची प्राणज्योत मालवली. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share