तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला

भंडारा : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे घडली आहे. रमेश हगरू आंबेडारे (५७, मुर्झा) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घटनेच्या दिवशी घटनेतील जखमी रमेश आपल्या पत्नीसह गावालगतच्या जंगल शिवारालगत तेंदुपत्ता संकलनासाठी गेला होता. जंगलात असलेल्या तेंदूच्या झाडाची पाने तोडत असतानाच अस्वलाने रमेशवर हल्ला चढविला. यात रमेशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Share