देवरी येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
देवरीः शहरातील प्रभाग क्र.१२ मस्कऱ्या चौक येथिल विवाहित महिला रिकुं हेमराज येरने घरातच पंख्याला ओळणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि.०३ मे रोजी सकाळी ९ दरम्यान उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की, देवरी शहरातील वार्ड क्र १२ येथील रहिवाशी नामे, रिंकू हेमराज येरने सदर विवाहीतेने घरातील कुणीही व्यक्ती घरी नसल्याने सूनाडाव बघून आत्महत्या केल्याची चर्चा वसाहतीत केली जात आहे. आत्महत्याचे कारण अद्याप कळले नसून, देवरी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद केली असून, मृतक विवाहितेच शवविच्छेदन करण्यासाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठविन्यात आले आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहे. एकूणच या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.