महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा – सरपंच विलास वट्टी

देवरी◼️महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीच्या वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याच्या दिवस आहे .ज्या भूमीने महान दूरदर्शी घडविले आहेत ,आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभ प्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याचे आमच्या बांधिलकीच्या आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. असे सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत बाम्हणी /ख. येथील सरपंच विलास वट्टी यांनी ध्वजारोहण करून भाषणातून दोन शब्द व्यक्त केले आहेत.
१ मे रोजी महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी लोक पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात. आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात. कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 64 वर्षापूर्वी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापना देखील १ मे रोजी करण्यात आली होती.
ग्रामपंचायत बाम्हनी/ ख येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन दिव्यांग व्यक्तींना 5 %निधी अंतर्गत अनुदानाचे वाटप करण्यात आले.यावेळी
उपसरपंच विकास खोटेले, ग्रामसेवक एम. जे. पदा, पोलीस पाटील गुरुदेवजी खोटेले,
सदस्य अनिलजी मेश्राम, ज्योतीताई बोरकर, मोहनी मडावी, रेखा शिवणकर,ताराचंद कोडापे,नोविन मेश्राम, अर्चना चिचाम, कल्पना तवाडे, ए. एन. वाटकर मॅडम, आशा वर्कर, अंगनवाडी सेवीका उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share