2.12 लाखांची देशीविदेशी दारु जप्त

गोंदिया: दुचाकीने अवैधरित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना अटक करुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने 30 मार्च रोजी शहरातील शिवाजी चौकात 2 लाख 12 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिस विभागातर्फे कायदा व सुव्यवस्था बाधित करणार्‍या तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍याविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

यांतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 30 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून शिवाजी चौकात अरविंद यशवंत डोंगरे (25, रा. तांडा) व किशोर प्रभुदास शहारे (41, रा. म्हसगाव) यांना दुचाकीने अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. Gondia-liquor-Elections 2024 दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून दारु व दुचाकी असा एकूण 2 लाख 12 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिस ठाण्यात कलम 65 (ई), 77 (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Gondia-liquor-Elections 2024 ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस अंमलदार कृपाण, पोलिस हवालदार हलमारे, लुटे, बिसेन, पोलिस शिपाई रहांगडाले यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share