आता ३० विद्यार्थ्यांच्या मागे मिळणार एक शिक्षक

संचमाण्यतेचे सुधारित निकष जाहीर ; १५ नोव्हेंबरपूर्वीच शिक्षकांचे समायोजन

गोंदिया⬛️राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बलकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनयम २००९ च्या अनुषंगाने नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे, शाळांमधील संरचनात्मक बदलीसाठी संचमान्यतेचे सुधारित निकष तयार केले आहेत. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी ३० विद्यार्थ्यांसाठी एक, सहावी ते आठवीसाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक आणि नववी व दहावीसाठी ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात येणार आहे.

दरम्यान शाळांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागत होते. परंतु आता दरवर्षी अशा कर्मचाऱ्यांचे समायोजन १५ नोव्हेंबरपूर्वी करण्यात येईल. त्यासाठी राजय शासनाकडून समायोजनाची सुधारित कार्यपध्दती जाहीर करण्यात आली आहे.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आरटीईच्या निकषानुसार आवश्यक ३० विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच १६ विद्यार्थी असल्यास एक शिक्षक देण्यात येईल. विद्यार्थी संख्येच्या गटांपेक्षा

संख्या कमी झाल्यास संरक्षित पद कमी होईल. पहिली ते पाचवी गटात २१० पेक्षा जास्त विद्यार्थी असलयास २१० विद्यार्थ्यांपर्यंत ७ शिक्षक आणि तयावरील प्रती ४० विद्यार्थी संख्येवर पद देण्यात येईल.

सहावी ते आठवी गटात आरईटीच्या निकषानुसार आवश्यक ३५ विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच १८ विद्यार्थी असल्यास एक शिक्षक देण्यात येईल. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित पद कमी होईल. नववी ते दहावी गटात २२० पेक्षा अधिक विद्यार्थी असलयास पुढील नवीन पद देय राहील. संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देतांना६ वी ते ८ वी या गटासाठी मंजूर शिक्षकांच्या मर्यादेत विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Share