निवडणूक पार्श्‍वभूमीवर देवरी पोलिसांचा रूट मार्च

देवरी: लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव शांततेत पार पडावी, यासाठी चिचगड पोलिस ठाण्यात 19 मार्च रोजी शांतता समिती व जातीय सलोखा समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले. तसेच पोलिसांचा रुट मार्च काढून मतदान जनजागृती करण्यात आली.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी़ विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाइी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करुन होळी, धुलीवंदन, गुडफ्रायडे, गुडीपाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम जयंती शांततेत पार पडावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, ठाणेदार तुषार काळे यांच्या मार्गदर्शनात मोतीनगर टी-पाईंट येथून बाजार चौक, दुर्गा चौक, जामा मस्जिद, इंदिरानगर मार्गे श्रीराम विद्यालयपर्यंत पोलिसांनी रुटमार्च करुन शक्ती प्रदश्रन केले. यादरम्यान आदर्श आचारसंहितेदरम्यान काय करावे व काय करु नये याबाबत जनजागृती करण्यात आली. रुटमार्चमध्ये 2 अधिकारी, 12 अंमलदार, आयआरबीचे 1 अधिकारी, 12 अंमलदार व 13 सैनिक सहभागी झाले होते. संचालन पोलिस हवालदार सुधाकर शहारे यांनी केले. आभार पोलिस हवालदार नितिन शिरपुरकर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share