नाली साफ करतांना ग्रामपंचायत सदस्यांना शिवीगाळ, दगडाने मारून जखमी केले
देवरी ◼️ तालुक्यातील ग्राम पंचायत सुरतोली अंतर्गत ०६/०५/२०२४ चे ०८/३० वा.ते ०८/४५ वा. दरम्यान, यातील फिर्यादी तेजराम गणुजी भुते, वय ६६ वर्ष, रा. चारभाटा, ता. देवरी, जि.गोदिया व आरोपी हे एकाच गावातील राहणारे व ऐकाच जातीचे असुन एकमेकांच्या घराशेजारी राहतात. सदर घटनेतील आरोपी हा आपल्या घरासमोर नाली साफ करतांना ग्रामपंचायत सदस्यांना शिवीगाळ करीत होता तेव्हा दिनेशकुमार तेजराम भुते हा त्यास हटकण्यास गेला असता आरोपीने शिवीगाळ करून बाजुला असलेला दगड उचलुन फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यावर मारून जखमी केल्याने असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवाल वरून पोस्टे देवरी येथे अप क. १३२/२०२४ कलम ३२४,५०४ भादवी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोना. शेडें पोस्टे. देवरी, हे करीत आहेत.