आदर्श शाळा सावलीच्या शिर पेचात मानाचा तुरा
देवरी◾️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जि प आदर्श शाळा सावली जिल्ह्यात जिल्हा परिषद गटातून प्रथम मानांकन पटकावले. यशाचे श्रेय मार्गदर्शक महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी, एस जी वाघमारे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती देवरी धनवंत कावळे गट समन्वयक देवरी, सुरेंद्र जगणे केंद्रप्रमुख डोंगरगाव ,लोथे सर, मस्के सर ,डोंगरे सर बीआरसी देवरी यांच्या प्रेरणेने आदर्श शाळा सावलीने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मानांकन मिळविण्यात यशस्वी झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही भौतिक सुविधा वर आधारलेली असून लोकवर्गणी व सी एस आर फंड या उपक्रमातून सावली शाळेने विभागीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा मान मिळविला .शाळेला उत्तुंग व सुंदर बनवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कापसे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, विषय शिक्षिका वर्षा वालदे सहाय्यक शिक्षक तुषार कोवले व सहाय्यक शिक्षक जोहनलाल मलगाम ,स्वयंसेविका माया ऊईके वैशाली बिजलेकर ,सोनवणे मॅडम यांनी अथक परिश्रम करून सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील याचे नेटाने प्रयत्न केले. संजय बिनझलेकर व्यवस्थापन अध्यक्ष ,झुलनताई पंधरे सरपंच, राजेश्वरी बिंजलेकर सरपंच, प्रभू दयाल पवार तंटामुक्त अध्यक्ष चंद्रशेखर रंहागडाले पोलीस पाटील, शिवेंद्रसिंह परिहार उपाध्यक्ष अनिल खंडाळकर सदस्य, मनोहर भेलावे सदस्य, अनिल भेलावे सदस्य ,संतोष कंसमारे सदस्य, ललित पवार सदस्य ,छन्नेस्वरी वैद्य सदस्य ,हेमलता चकोले सदस्य इंदिरा पंधरे, सदस्य अश्विनी मुनेश्वर सदस्य, छायाताई शहारे सदस्य ,मनोरमा शेंडे सदस्य नाजुका ताई गौतम ग्रामपंचायत सदस्य, निर्मला शिवणकर ग्रामपंचायत सदस्य ,निर्मला मेंढे ग्रामपंचायत सदस्य, कैलास भेलावे सदस्य ,पुष्पराज पंधरे सदस्य प्रवीण सोनटक्के सदस्य व शिवणकर साहेब ग्रामसेवक तसेच या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळा उत्थानासाठी श्रमदान केले व गावातील गणमान्य व्यक्तींनी मोलाचे सहकार्य दिले त्याबद्दल सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त केले.