‘मुख्यमंत्री माझी शाळा’ उपक्रमात शिवाजी विद्यालय जिल्ह्यात अव्वल

देवरी : स्थानिक देवरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व शासकीय शाळांचे केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय प्राप्त अहवालानुसार जिल्हा मुल्यांकन समितीमार्फत मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये खाजगी अनुदानित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल शाळेतील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व पर्यवेक्षिय यंत्रणेचे अभिनंदन कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, संस्थेचे सचिव अनिलकुमार येरणे यांनी केले आहे. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share