उमेंद्र बिसेन यांच्या ‘मायारु मोरी बोली’ पुस्तकाचे प्रकाशन

आमगाव ◾️धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मराठी विभाग व जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव साहित्यधारा २०२३-२४ साहित्य गौरव पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मातोश्री विमलताई देशमुख सभागृहात धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे पार पडला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत कवी उमेंद्र बिसेन (प्रेरीत) यांच्या पोवारी बोली भाषेतील ‘मायारु मोरी बोली’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पार पडले. कवी उमेंद्र बिसेन हे मराठी तसेच पोवारी भाषेतील युवा साहित्यिक असून त्यांचे हे पहिलेच पुस्तक आहे. या प्रकाशन समारंभाप्रसंगी सम्मेलनाध्यक्ष मा. डॉ. शरद निंबाळकर (माजी कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला), ज्येष्ठ विचारवंत नागपूर ॲड. वामनराव चटप (माजी आमदार राजुरा), प्रमुख अतिथी मा. कल्याणी मादेस्वार (कवयित्री यवतमाळ), मा. दुशांत निमकर (शब्दांकूर फाऊंडेशन चंद्रपूर)

मा. प्रदिप पवार ज्येष्ठ चित्रकार नागपूर, स्वागताध्यक्ष मा. डॉ. भारती खापेकर ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री नागपूर समूह निर्माते गणेश दादा कुंभारे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share