शब्द रजनी साहित्य समूहाचा प्रथम वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा
पुणे २०:- शब्दरजनी साहित्य समूहाचा आज पहिला वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार आणि पाच दिवसीय महास्पर्धो समूह संस्थापक कवयित्री अनिता आबनावे आणि समूह आयोजिका राजश्री भावार्थी , कवयित्री नंदीनी सुकाळे यांनी आयोजित केली होती. प्रथम वर्धापन दिन आणि महास्पर्धेचे उद्घाटन समारंभ ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. पाच दिवसीय महास्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. निरेन आपटे ( जाहिरात निर्माता, पत्रकार,कथा लेखक) सरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ साहित्यिक विजय सातपुते आणि बी. सोनवणे सरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांना ऑनलाईन शाॅल, नारळ फुलगुच्छ आणि विशेष सन्मानपत्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे. जेष्ठ साहित्यिक विजयदादा सातपुते आणि कवी बी सोनवणे सर, कवयित्री राजश्री भावार्थी, नंदिनी सुकाळे,शब्दरजनी साम्राज्ञी अनिता ताई गुजर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आई काव्यसंग्रह प्रकाशित करणारे संपादक कवी. भूषण सहदेव तांबे यांना गौरविण्यात आले आहे. समूहाचे पहिले परीक्षक म्हणून कवयित्री प्रतिक्षा विभूते यांना प्रमुख पाहुणे निरेन आपटे यांच्या शुभहस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वर्षभर होणाऱ्या उपक्रम आणि स्पर्धेत सातत्याने सहभागी असणाऱ्या ६५ कवींना विशेष पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.