आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची प्रकल्प कार्यालयाला भेट
देवरी◼️ आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयीन अडीअडचणी संदर्भात देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला भेट देवून चर्चा केली. तसेच सर्व कार्यासन विभागाची पाहणी केली.यावेळी विजय वाघमारे यांनी कार्यालयामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रसंगी प्रकल्प अधिकार्यांनी मागील दोन-तीन वर्षापासून देवरी प्रकल्पामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून देवरी प्रकल्पातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे इतर प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे जात असल्याचे बाब सचिवांच्या निर्दशनास आणून दिली.
यावर सचिवांनी देवरी प्रकल्पामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या कामाचे कौतुक करून असेच कार्य पुढे नियमित कार्यरत असावेत असे शुभेच्छा दिल्या. दरम्यान विजय वाघमारे यांनी बोरगाव बाजार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी विद्यालयाला भेट दिली. येथे प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या मिशन शिखर अंतर्गत जीनीट, एमएचटीसीईटी ज्या शिकवणी वर्गाला भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासोबतच सचिवांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांसोबत हितगुज करून भविष्य वेध शिक्षण प्रणाली बाबत आढावा घेतला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार…
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल विद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी बलदेव कोटवार व कमलेश भगतसिंग मडावी यांनी क्लेट स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. याबद्दल त्यांचा विजय वाघमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसभेच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर देवरी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1 व 2 येथे भेट दिली व गृहपाल यांच्यासोबत चर्चा करून वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक आढावा घेतला.
आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी ग्राम संघ सामूहिक वन हक्क प्राप्त 30 ग्राम संघाचे अध्यक्ष व सचिवांना वन हक्क संवर्धन, वन गौणउपज याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसंघाच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात वन विभागाच्या सचिवासोबत चर्चा करून समन्वयाने सदर समस्याचे निराकरण करण्याबाबत संबंधित सांगितले.