ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट ऑफिसला भेट, मामाला पाठविले पत्र

देवरी: येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट ऑफिसला नवीन वर्षानिमित भेट दिली आणि मामाला पत्र पाठवून एका वेगळा उपक्रम साजरा केला.
आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानानाच्या युगात पत्र ही संकल्पना संपत चाललेली आहे. विद्यार्थ्यांना पत्र आणि पत्र पाठविण्याचे प्रत्यक्षात अनुभव यावे या उद्देशाने मराठी शिक्षक स्वप्निल पंचभाई व विश्वप्रीत निकोडे यांच्या सहकार्याने सदर क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात स्वतः लिहिलेले पत्र आपल्या मामाला व आवडत्या नातेवाइकाला लिहून पोस्टात जाऊन पाठविले, यावेळी पोस्ट ऑफिसच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सविस्तर प्रक्रिया समजावून सांगितली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Print Friendly, PDF & Email
Share