नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार तीन वाघ
गोंदिया: सात महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी जंगलातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. आता या अभयारण्यात पुन्हा 3 वाघ सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यासाठी वाघांना इतर ठिकाणांहून येथे आणले जात आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या सुमारे 16 वाघ असल्याची माहिती आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आल्या. या व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्प्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या आहेत. आता दुसर्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुसर्या टप्प्यात या व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ सोडण्याचे नियोजन असून या टप्प्यात लवकरच एक वाघ येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पात हमखास वाघाचे दर्शन होणार असल्याने पर्यटकांची भेटी वाढणार असून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.