ध्येयवेडी माणसाचं इतिहास घडवतात शुभम पसारकर

प्रत्येक माणसाच्या जीवनातील सुख दुःख हा पटशिवणीचा खेळ असतो , परंतु चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या जिल्ह्यातील बेघर ,बेवारस , भिक्षेकरी , अनाथ , निराधार, अपघातग्रस्त, मनोरुग्णांचा देवदूत बनला आहे. मानवी जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या शुभम पसारकर रोडवरील राहणाऱ्या मनोरुग्ण व विकलांसाठी खूप मोठे कार्य करित आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर व संपूर्ण टीम गोंदिया या जिल्ह्यामध्ये देवरी या शहरामध्ये रोडवरील बेघर ,बेवारस ,भिक्षेकरी ,निराधार, अनाथ ,मनोरुग्ण , अपघातग्रस्त या लोकांकारिता तीन दिवशीय मोहीम राबविण्यात आलेली आहे. शोध मोहिम म्ध्ये तिन मनोरुग्ण लोकाना आघोळ, कटींग, दाळी नवीन कपडे देउन त्या मनोरुग लोकांना समाजामद्ये घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशनच्या कार्याला हातभार लावून व आपल्या परिसरात अशी कोणी व्यक्ती आढळल्यास शुभम पसारकर यांना कळवाव त्याच्या विचारायच्या व समाजसेवेचा एक धागा बनूया . जामगांव (कोमटी) भिसी ता.चिमूर जि. चंद्रपूर येथील रोडवरील राहणाऱ्या लोकांकारिता निवारागृहाचे बांधकाम चालू आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत कपडे , रेती,लोहा,सिमेंट,आपापल्यापरीने सहकार्य करावे .ज्यामुळे आपल्या छोट्याशा प्रत्नामुळे एखाद्याला जीवन जगण्याचा आधार मिळेल.

Share