ओवारा ग्रामपंचायतीचा दिव्यांगांना आधार

देवरी ◼️महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २६१ पोट कलम एकनुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या स्व-उत्पन्नाच्या ५ टक्के निधीमधून दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेमधून ओवारा ग्रामपंचायतीने शुक्रवारी ग्रामपंचायत क्षेत्रातील सहा दिव्यांग लाभार्थीना सिलिंग पंखे भेट देऊन आधार दिला. ग्रामपंचायतचे सरपंच उमेश येरणे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी येथील शेवंता दसाराम वलके, सत्यभामा श्यामलाल लाडे, प्रकाश बेनीराम वलके, नारायण टेकाम, नरेंद्र कुवरलाल उईके व मच्छिंद्र सुनील सराटे या सहा दिव्यांग लाभार्थीना सिलिंग पंखे ग्रामपंचायतीकडून सरपंच उमेश येरणे व उपसरपंच शिवाजी पुसाम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. झेड. शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य ललित मेश्राम, धनीराम मरस्कोल्हे, सुरेश बी., शालू उईके, चित्रलेखा वलके व ग्रामपंचायत कर्मचारी मुन्ना मेश्राम उपस्थित होते.

Share