५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सिद्धार्थ हायस्कूल येथे संपन्न
प्रहार टाईम्स
देवरी : राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर पं.स. देवरी अंतर्गत शैक्षणीक सत्र २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाचे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि. ०४-०५ डिसेंबर २०२३ रोजी सिद्धार्थ हायस्कुल देवरी येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या उद्दघाटना प्रसंगी उद्घाटक म्हणून अंबिकाताई बंजार सभापती प .स . देवरी , अध्यक्ष अनिलकुमार बिसेन उपसभापती प.स. देवरी , प्रमुख उपस्थिती उषाताई शहारे जि. प. सदस्य, कल्पना वालोदे जि. प. सदस्य , वैशाली पंधरे प.स. देवरी शामकला गावड प.स. देवरी , भारती सलामे प.स. देवरी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच उदघाटनाप्रसंगी कश्यप सर विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरवात डॉ. होमी जहांगीर भाभा डॉ. अब्दुल कलाम यांच्या छायाचित्राला दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी प.स. देवरी यांनी केले . हा युग विज्ञानमुळे आहे आणि युगामध्ये क्षेप घ्यायची असेल तर निसर्गाकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन विध्यार्थ्यांना आत्मसात करावे असे मत व्यक्त केले तसेच अध्यक्षिय भाषणात अनिल बिसेन उपसभापती प.स. देवरी यांनी विज्ञानाची सखोल अशी व्याख्या व विविध थोर वैज्ञानिकांच्या चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन भूपेंद्र कुलसुंगे स.शी. यांनी केले.
सदर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन महेंद मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, देवरी यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचा मुर्तरुप देण्यासाठी तालुका विज्ञान विभाग प्रमुख व्ही. डब्लू. लोथे यांनी मोलाची भूमिका बजावली.