पोलिसांची एक दिवाळी आदिवासींसोबत

गोंदिया: जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने 5 नोव्हेंबर रोजी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र बोंडे हद्दीतील भसबोळण येथे ‘एक दिवाळी आदिवासींसोबत’ उपक्रम राबविला. यावेळी समाजबांधवांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना प्रती विश्‍वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर साहेब यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसिंगतंर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, चिचगडचे ठाणेदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनात सशस्त्र दुरक्षेत्र बोंडेचें प्रभारी अधिकारी प्रेमकुमार शेळके, पोउपनि हुर्रे यांनी जिल्हा पोलिस दल व नागपूरच्या माऊली सेवा मित्र मंडळाच्या सहकार्याने भसबोळण येथे एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत हा उपक्रम राबविला.

यावेळी भसबोळन येथील नागरिकांना 60 सोलर लॅम्प, 120 साडकया, 30 बेडशिट, 35 कुर्ते व दिवाळीनिमीत्त फराळाचे साहित्य असे विविध जीवनाआवश्यक सामान वाटप करण्यात आले तसेच नागपुरचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. संध्या आगरकर यांनी महिलांना स्त्री रोगाबाबद घ्यावयाच्या काळजी बाबद मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संरपच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती सदस्य, पोलिस पाटील व गावातील प्रतीष्टीत नागरीक उपस्थित होते.

Share