आय.टी.आय.अंतर्गत विविध व्यवसाय प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विदयार्थ्यांना टूल किटचे वाटप

देवरी:आदिवासी विदयार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीबरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये आय.टी.आय. प्रशिक्षण पुर्ण झालेल्या विदयार्थ्यांची गरज लक्षात घेता मोठयाप्रमाणात विदयार्थ्यांना स्वत:च्या रोजगार उपलब्ध व्होऊन कौटुंबीक उदरर्निवाह सक्षम होईल आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल
या उद्देशाने प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जवळपास ८४ विविध योजना राबविण्यात येत आहेत.याचा एकमेव उद्देश आदिवासी समाजाचा सर्वांगीन विकास करणे हाच आहे.असे प्रतिपादन देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले.
श्री राचेलवार हे देवरी येथे सोमवारी (ता.०६ नोव्हेंबर) रोजी आयोजीत
आय.टी.आय.अंतर्गत विविध व्यवसाय प्रशिक्षण पुर्ण केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना टूल किट चे वाटप. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
एकात्मिक आदिवासी विकास, प्रकल्प देवरी,जि गोंदिया च्या वतीने मागील दोन वर्षापासून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा सर्वागीन विकास करण्याच्या उदेशाने व्यवसाय क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी तसेच स्वत:चा रोजगार निर्माण करुन स्वताच्या पायावर उभे राहणे करीता सन २०२२-२३ मध्ये केंद्रवती अर्थसंकल्प योजना अंतर्गत आय. टी. आय. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना टूल किट पुरवणे अंतर्गत गोंदिया जिल्हयातील शिवनकला, मोटार मॅकेनिक, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर असे विविध व्यवसाय प्रशिक्षण केलेल्या विदयार्थ्यांना एकुण १०० टूल किट चे वाटप सोमवार(ता.०६ नोव्हेंबर) रोजी विकास राचेलवार यांचे प्रमुख उपस्थित व आय.टी.आय. देवरीचे प्राचार्य हितेश नंदेश्वर तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही.पी गायकवाड,आणि कनिष्ठ लिपीक ताराचंद मडावी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना टूल किट चे वाटप करण्यात आले.

Share