देवरी दसरा उत्सवाची जय्यत तयारी 51 फुटाचा रावणाचा पुतळा तयार

देवरी 25: दसरा उत्सव समितीची जय्यत तयारी सुरु असून 51 फुटाचा आकर्षक रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. दसरा निमित्ताने आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देवरावाशीयांना अनुभवायास मिळणार आहे.

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.निश्चितच यावर्षीच्या दसरा उत्सवाची देवरीकर आतुरतेने वाट बघत आहेत.

Share