घरफोडीचा आरोपी मध्यप्रदेशातून जेरबंद

गोंदिया◼️ शहरातील एका घरात कपाटाचे कुलूप दुरूस्तीच्या नावावर 220 ग्रॅम सोन्याचे दागीणे लंपास करणार्‍या आरोपीला शहर व गुन्हे शाखेच्या पथकाने बेळ्या ठोकल्या आहेत. गुरुबिर धिरसिंग सिंग (31) रा. बापुनगर, उधना, जि. सुरत (गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. अधिक तपासासाठी आरोपीची 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या सभागृहात आज 9 रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

शहरातील सिव्हिल लाईन येथील ममता खटवाणी यांनी 21 ऑगस्ट रोजी रस्त्यावर फिरून कपाटाचे कुलूप दुरूस्ती, चाबी बनविणार्‍या एका अनोळखी इसमाला आपल्या राहते घरी लोखंडी कपाटाचे कुलूप दुरुस्तीकरीता बोलावले. कपाटज्ञचे कुलूप दुरुस्ती करतंना सदर इसमाने कपाटातील 220 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. सदर प्रकार कळताच ममता यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चोराने त्याच्या कौशल्याचा वापर करून कोणतेही पुरावे सोडले नसल्याने चोराचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले.

पथकामार्फत जिल्ह्यात कपाटाचे लाँक दुरुस्ती करणारे, चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, इतर चोरीचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेत विविध गुन्हेगारांची माहिती काढून त्याचे विश्‍लेषण करण्यात आले. बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेज आणि तांत्रीक विष्लेषण करण्यात आले. यानंतर आरोपी शहरातील हॉटेल सेंट्रल पॉईट येथे थांबला असल्याची खात्रीशिर माहिती माहीती झाली. पोलिसांनी तेथे गेले अससता आरोपी पळून गेला होता. आरोपी गुजरात राज्यातील उधना येथील असल्याचे कळताच उधना येथे पालिस पथक रवाना करण्यात आले. मात्र तो तेथेही मिळाला नाही. तो मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्याच्या कातीया गावात राहत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने ताब्यात घेत त्याची विचारपूस केली. त्याने ताला दुरुस्तीचे कामाने गोंदिया येथे आल्याचे व 21 ऑगस्ट रोजी खटवानी यांच्या घरी चोरी केल्याचे सांगीतले.

आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेत्या 220 गॅम दागीण्यांपैकी 175 ग्रॅम वजनाचे दागीणे किमत 11 लाख 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल व मोबाईल हस्तगत करून त्याला न्यायालयात सादर केले असता 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगीतले. (Burglary accused) ही कारवाई दिनेश लबडे यांचे नेतृत्वात, सहायक पोलिस निरिक्षक विजय शिंदे, पोलिस उप निरिक्षक महेश विघ्ने, महिला पोलिस उप निरिक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन, चित्तंरजन कोडापे, चेतन पटले, पोलिस शिपाई संतोष केदार, हंसराज भांडारकर, चालक पोलिस हवालदार, घनश्याम कुंभलवार, लक्ष्मण बंजार, सायबर सेलचे पोलिस हवालदार, दिक्षीत दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share