बंजारा समाजाचा तिज उत्सव दणक्यात साजरा, संस्कृती जपण्याचा दिला संदेश

देवरी ◼️महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील देवरी परिसरात शासकीय नोकरी करीत असलेली बंजारा संस्कृती अबाधीत राहावी या उद्देशाने बंजारा बांधवानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिज उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. सदर उत्सव देवरी येथे मागील 08 वर्षा पासुन नियमित बंजारा चालीरीती व परंपरा नुसार दिनांक 27/08/2023 पासून आजपावेतो मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. तसेच हा उत्सव साजरा करण्यामागे एक बंजारा बांधवाची नैसर्गिक रुढी परंपरा आहे की गहुची उगवण क्षमता किती आहे हे स्पष्ट होते तसेच कित्येक वर्षापासुन हे बांधव ही परंपरा जपत आहे आपल्या जन्मभूमी पासून ते कर्म भूमीत सुद्धा कर्मचारी बांधव आपल्या समाजाच्या चालिरिती आजही जपतात आणि या उत्सवात महिला भगिनी रोज जिथे पेरणी करतात त्या ठिकाणी रोज नृत्य सादर करून ही परंपरा जपतात आजच्या तांत्रिक युगात जुनी रूढी परंपरा लोप पावत चालल्या आहेत म्हणून आपली येणारी पिढीला याचा वीसर पडू नये म्हणून हे बंजारा बांधव ही प्रथा कायम जपतात म्हणून संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्र तील सर्व बंजारा बांधव कडून या सर्व कर्मचारी बांधवाचा स्वागत करण्यात येत आहे सदर उत्सवात गोकुळ राठोड (नायक)
प्रकाश चव्हाण (कारभारी), मुकुंद जाधव (सहा.पोलीस निरीक्षक), मिथुन चव्हाण , पंकज राठोड, शिवम राठोड , हरिदास राठोड, निलेश जाधव, रविकुमार जाधव, प्रकाश चव्हाण, श्री कमलेश चव्हाण, श्री विष्णु प्र. राठोड, श्री भूषण जाधव, अंकुश पवार, सुनील राठोड, यादवराव जाधव, विष्णु राठोड, चव्हाण, उमेश चव्हाण, गजानन आडे, सुनिल आडे यांनी उत्साहात sajra केला असुन बंजारा संस्कृती जोपासण्यासाठी तिज व होळी दरवर्षी साजरी करणार असल्याचे सांगितले. तसेच तिज उत्सव समिती देवरी कडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share