देवरी : चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटणारी टोळी जेरबंद, अप्पर पोलीस अधिक्षक यांनी पत्रकार परिषद

■ वाहनासह चार आरोपी देवरी पोलिसांच्या जाळ्यात

देवरी : शहरातील अग्रसेन चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचालकास चाकू दाखवून त्याच्याकडील ८ हजार ३०० लुटल्याची घटना २३आगस्ट रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणातील आठ आरोपी फरार होते, त्यांचा शोध घेत देवरी पोलीस आणि एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४ आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांनी माध्यमांना दिली.

सदर गुन्हयाच्या घटनास्थळाचे भौतिक पुरावे, प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता, सदरचा गुन्हा फिर्यादीच्या जागी यापुर्वी नोकरी करत असलेला इसम नामे युसुफ खान रा. अमरावती याने करवला असल्याची शंका आली. त्यानुसार तपास केला असता,सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे–

दरोडा घालणारे आरोपी नामे

1) सलमान नियामत खान वय 20 वर्षे, पत्ता- हनुमान नगर हैदरपुरा, शकील किराणा दुकान जवळ, अमरावती

2) मोहम्मद खान समीउल्ला खान वय 28 वर्षे, पत्ता- लालखडी, रींग रोड, नवसारी अमरावती

3) मोहम्मद शोहेब मोहम्मद शब्बीर वय 27 वर्ष, पत्ता नालसाहेबपुरा, अमरावती

4) शेख तौफीक शेख मुस्ताक वय 24 वर्षे पत्ता लालखडी चौक बिस्मील्ला नगर, जि. अमरावती

5) शेख नदीम शेख नबी पत्ता-सावंगी, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती

6) शेख युसुफ शेख अन्नु पत्ता- आलीमनगर अमरावती यांचा दरोडयात सहभाग असल्याची खात्री झाली

1) साहील खान उर्फ शेख तोसीफ शेख मुस्ताक वय 24 रा. लाल खडी चौक बिस्मिल्ला नगर जिल्हा अमरावती यास पोउपनी विघ्ने यांचे पथकाने तुमसर भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच सपोनि विजय शिंदे, यांचे पथकाने आमरावती येथे रवाना होवून आरोपी नामे
2) सलमान नियामत 20 वर्ष, पत्ता- हनुमान नगर हैदरपुरा, शकील किराणा दुकान जवळ, अमरावती

3) मेहबुब खान खान वय 28 वर्ष, पत्ता- लालखडी, रंग रोड, नवसारी अमरावती

4) मोहम्मद शाहेब मोहम्मद शब् 27 वर्ष, पत्तानालसाहेबपुरा, अमरावती यांना अमरावती येथून शोध घेवुन वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आल्याने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा शेख युसुफ शेख अन्नू याचे सांगण्यानुसार केला असल्याची कबुली दिली. युसुफ खान हा मालक नामे मुजीब रहमान यांचे ट्रकवर सदर गुन्हयातील फिर्यादी फिरोज गुलाम हुसेनखा वय 38 वर्षे यांचे जागेवर पुर्वी चालक म्हणुन नोकरी करत होता. फिर्यादी फिरोजखा यास त्याचे विरूद्ध मालकाचे कान भरल्याने नोकरीवरून काढले होते याचा राग त्याचे मनात होता. यासाठी कट करून सदरचा गुन्हा शेख युसुफ शेख अन्नू याने त्यांना करायला सांगीतला असे त्यांनी सांगीतले. आरोपी यांचे ताब्यातून 1200 रूपये रोख मिळून आले सदर पैसे फिर्यादी कडून जबरदस्तीने घेतल्याचे त्याने सांगीतले. तसेच त्याचे ताब्यातील टाटा इंडीगो वाहन क्र एम एच 27 ए सी 6262 हस्तगत करण्यात आले. सदर वाहन त्याने गुन्हयात वापरले असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींच्या नातवाईकांना माहीती देवून त्यांना पुढील कारवाईकामी वैद्यकीय तपासणी करून देवरी पोलीस ठाणे पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण डांगे, ठाणेदार देवरी पुढील तपास व कायदेशिर कारवाई करीत आहेत.

उर्वरीत फरार आरोपी १ ) शेख नदीम शेख नबी पत्ता-सावंगी, ता. चांदुर रेल्वे, जि.अमरावती

२) शेख शेख अनु पत्ता- आलीमनगर अमरावती यांचा शोध घेण्यात येत आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई मा.वरिष्ठांचे निर्देश, आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात सपोनी विजय शिंदे, महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बिसेन, हंसराज भांडारकर, संतोष केदार, चापोशि कुंभलवार, चापोहवा बंजार, स.फौ. कृपाण, पो.हवा. देशमुख, हलमारे, सायबर सेलचे पोहवा. दीक्षित दमाहे, प्रभाकर पालांदुरकर, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, तसेच ठाणेदार देवरी प्रवीण डांगे, यांचे मार्गदर्शनात पो.हवा. करंजेकर, डोहळे, पो. शि. चव्हाण, जाधव, कांदे यांनी केलेली आहे. वरिष्ठांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

चार चाकी वाहनासह मोबाईल फ़ोन आणि रक्कम पोलिसांच्या हाती लागले आहे. सदर पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर , पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, एल सी बी गोंदिया चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share