डोंगरगाव येथे महा-आरोग्य शिबिरात ९५० रुग्णांची तपासणी व मोफत औषध वाटप

◼️डोंगरगाव (सावली )महा-आरोग्य शिबिर संपन्न , ९५० रुग्नाची तपासणी

देवरी ◼️ग्रामीण भागामध्ये अनेक रुग्ण वेळेवर आरोग्य तपासणी करत नसल्यामुळे लोकांमध्ये दुर्दैवाने विविध आजार पसरत असल्याची घटना घडत असतात. त्यामुळे लोकांमध्ये आरोग्य तपासणी बद्दल जनजागृति व्हावी म्हणून ग्रामपंचायत डोंगरगाव ( सावली) ,आरोग्य विभाग डोंगरगाव , प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला च्या सयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत च्या भव्य पटांगनावर महा आरोग्य शिबीर व मोफत तपासणी तसेच मोफत औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामवासीयांनी स्वयं प्रेरणेने पुढे येउन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. या शिबिरात बाल वृद्धा पासून तरुण तरुणी , महिला , पुरुष एकूण ९५० ग्रामस्थानी तपासणी केली, विशेष म्हणजे यावेळी शालेय विद्यार्थीसह ग्रामास्थानी योग व प्राणायाम, व्यायाम करुण आरोग्याबद्दल माहिती घेतली.


सदर शिबिराचे उदघाटन जिप महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी प्रमुख अतिथि म्हणून पॅं. स. सदस्य वैशाली पन्धरे , सरपंच सुरेन्द्र परतेकी , अनिल नेवारे व ग्रामपंचायत सचिव ,पदाधिकारी व डॉ. सुजाता ताराम उपस्थित होते.
यावेळी आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरकांची चमू उपस्थित होती . यामध्ये , डॉ . दिगंबर मरस्कोल्हे ,,डॉ .शंकर बनोटे , डॉ . लोकेश चिरवतकर , डॉ सुमित पाल , डॉ उमेश नेताम , डॉ येरणे, मनीषा मोहुर्ले , योगशिक्षीका तुप्पट मैडम यांनी विशेष सहकार्य केला . डॉ. सुजाताताराम व त्यांच्या चमूने सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांच्या सहकार्यातून भव्य शिबीर यशस्वीपणे पार पाडले.

Print Friendly, PDF & Email
Share