पोलीस निरीक्षक प्रविण डांगे यांची ब्लॉसम शाळेला भेट, विद्यार्थी सुरक्षा विषयी केले मार्गदर्शन

◼️विद्यार्थी व रस्ता सुरक्षेबद्दल शिक्षक, चालक आणि वाहकांना केले मार्गदर्शन

देवरी ◼️ तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी नुकतीच भेट दिली असून प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या दालनात शाळेतील शिक्षक , वाहन चालक, वाहक, परिचारक यांना विद्यार्थी सुरक्षा, रस्ता सुरक्षा , जनजागृती विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी शालेय आवारात तसेच शाळेच्या समोरील भागात २४ तास सीसीटीव्ही कार्यान्वित असावे तसेच अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येणार , विद्यार्थी शाळेत येतांना आणि सुट्टीनंतर घरी जातांना सुरक्षित कसे जातील याविषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस स्टाफ मडावी यांच्या सह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share