दिव्य ज्योती जागृती संस्थान व ग्रा. पं. गोटाबोडी तर्फे वन महोत्सव

◼️हरित मुहिम : १००० रोपट्यांची लागवड

देवरी ◼️तालुक्यातील गोटाबोडी येथे भव्य वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख उपस्थिती म्हणून दिव्य ज्योति जाग्रति संस्थान चे महाराष्ट्र प्रमुख स्वामी श्री. चिदानंदजी, ग्रामपंचायत, गोटाबोडीचे सरपंच मनोहरजी राऊत , दिपकजी बावनथळे उपसरपंच, कल्पनाताई वालोदे जि. प. सदस्य, प्रविणजी डांगे पोलीस निरीक्षक, सोनकुसरे साहेब वनपरिक्षेत्र (सा.वनी.)अधिकारी, कांबळी साहेब वनपाल, देशमुख साहेब ग्रामविकास अधिकारी, कारेमोरे पोलीस पाटील , डॉ. खंडागळे , डॉ. बिसेन मॅडम तसेच दिव्य ज्योति जाग्रति संस्थान चे प्रचारक साध्वी हिराभारतीजी, साध्वी माधुरी भारतीजी, गुरुभाई उत्तरेश्वरजी व सर्व दिव्य ज्योति परिवार आणि अनेक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

वन मोहत्सव दरम्यान दिव्या ज्योति जाग्रति संस्थानचे सर्व सदस्य व सर्व गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात वृक्षरोपण करण्यात आला त्यामध्ये अनेक रोपटे जसे आंबा, शिशिम, जाम्भुड, करंजी, सिताफळ, वड, पिंपळ, आवडा असे वृक्ष लावण्यात आले व अश्या प्रकारे कार्यक्रम जो समाजाला लाभकारी होतील असे कार्यक्रम नेहमी दिव्या ज्योति जाग्रति संस्थान तर्फे घेतले जातात. या वन मोहत्सवामध्ये दिव्या ज्योति जाग्रति संस्थान व ग्रा. पं. गोटाबोडी द्वारे १००१ वृक्षांची लागवड करण्यात आली.

Share