आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

भंडारा ◼️तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांवर तुमसर तर काहींवर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून विद्यार्थ्यांची प्रकृती धोका बाहेर असल्याचे समजते. दरम्यान भंडारा येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खासदार सुनील मेंढे यांनी भेट घेत चौकशी केली. गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदिवासी आश्रम शाळा तुमसर तालुक्यातील येरली येथे आहे. या आश्रम शाळेत 431 विद्यार्थी आहेत. 24 ऑगस्ट रोजी मुले मुली मिळून 316 विद्यार्थी उपस्थित होते.

bhandara

या विद्यार्थ्यांनी दुपारी बटाटे वाटाण्याची भाजी, वरण-भात जेवण केल्यानंतर संध्याकाळपासून विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि पोटदुखी असा त्रास होऊ लागला. याची माहिती गोबरबाही प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्यानंतर तेथील पथकाने येऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली. या विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थ्यांची प्रकृती खराब असून अधिक त्रास होत असल्याने रात्री आठ वाजता त्यांना आधी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 23 विद्यार्थ्यांना अधिक त्रास झाल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री दहा वाजता उपचारासाठी आणण्यात आले. दोन्ही रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्यावर असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाने अन्नाचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेतले असून विद्यार्थ्यांना नेमका त्रास कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.खासदारांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

घटनेची माहिती होताच खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करून घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या तब्येती संदर्भात माहिती जाणून घेतली. Ashram school उपचारात कुठेही कमतरता राहू नये, असे निर्देश देताना खाटांवर टाकलेल्या बेडशीट नाराजी व्यक्त करीत त्या ताबडतोब बदलण्याची निर्देश खासदारांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईकांशी खासदारांनी यावेळी रुग्णालय परिसरात संवाद साधला. घाबरून जाऊ नये. सर्वतोपरी चांगले उपचार देण्यात येत असून मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असण्याची त्यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, सार्वे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोयाम, डॉ. टेंभुर्णी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share