देवरी येथे पहिले कोविड लस डॉ.आनंद गजभिये वैद्यकीय अधीक्षक यांना

डॉ. सुजित टेटे

देवरी १६: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड १९ लसीचे उद्घाटन केल्या नंतर कोविड १९ वॅक्सिनेशनसाठी ग्रामीण रुग्णालयात देवरी सज्ज झाले असून आज सकाळी 11:26 वाजता वॅक्सिनेशन ला सुरुवात झाली असुन पहिले वॅक्सिन ग्रामीण रुग्णालय देवरी चे डॉ. आनंद गजभिये, वैद्यकीय अधीक्षक वर्ग -१ यांना देण्यात आली असून त्यांना निरीक्षणा खाली ठेवण्यात आले असून लसीकरणा नंतर त्यांना कुठलेही त्रास न झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जिल्ह्यातील- गोंदिया, तिरोडा आणि देवरी येथे अशा 3 केंद्रावर होणार लॉंचिंग वॅक्सिनेसन
शनिवार दि. 16 जानेवारी पासून जिल्हयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाला शुभारंभ झाला आहे. कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात 16 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रावर कॉरोना लसीकरण लौंचिंग मोहिमेचे आयोजन केले आहे. यात GMC गोंदिया येथील KTS रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय (SDH) तिरोडा व ग्रामीण रुग्णालय (RH) देवरी येथे LAUNCHING vaccination झाले.

या दिवशी 100 कर्मचाऱ्यांना लसीकरण चे टार्गेट आहे, त्या त्या ब्लॉक मधील आरोग्य कर्मचारी कॉरोना vaccine घेतील. ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी झालेल्यानाच फक्त vaccine मिळेल. त्या नंतर 28 दिवसांनी पुन्हा दुसरा डोस मिळेल या पार्श्वभूमिवर आज जिल्हयात 8 हजार 500 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना ‘frontline worriers’ ला पहिल्या व 28 दिवसानंतरच्या दुसऱ्या अशा दोन्ही डोजसाठी 10000 डोजेसचा साठा उपलब्ध झाला आहे. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढिल आठवडयात साठा उपलब्ध आहे. आज आलेल्या 10000कोरोना लस आवश्यक तापमानात कोल्ड चेन मध्ये ठेवण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहिर केली.

ग्रामीण रुग्णालय देवरी येथे लसीकरणा च्या वेळी डॉ ललित कुकडे तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी, डॉ निखाडे, डॉ. बनसोडे, यांच्या सह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share