क्लासमेट इन्फोटेकच्यावतीने स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुषांच्या जीवनावर परीक्षेचे आयोजन
◼️देवरी तालुक्यातील लोहारा , डोंगरगाव येथील शाळा महाविद्यालयात आयोजन
देवरी :महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) ही संस्था महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्रातील ९ प्रमुख विद्यापीठे, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात ही संस्था गेली २१ वर्षे कार्यरत आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून परीक्षेचे आयोजन शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही क्रांतिकारी , सत्याग्रह , स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित परीक्षा द्यावी असा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. सदर परीक्षा क्लासमेट इन्फोटेक व कंप्यूटरच्यावतीने ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच पेपरवर घेतली असून या परीक्षा मधे सुभाष हाईस्कूल डोंगरगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आले नाही.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास बोरकर शिक्षक मेंढे आणि ढवळे तसेच सुभाष हायस्कूल डोंगरगाव चे मुख्याध्यापक टी.एस. कटरे, शिक्षक केसी कटरे, विनायक येडेवार, श्री. लहाने यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
सदर परीक्षेच्या यशासाठी क्लासमेट इन्फोटेक व कंप्यूटरचे समन्वयक रंजित टेटे यांनी परिश्रम घेतले असून सर्वांचे आभार मानले.