स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कान्होली येथे “शिलालेखाचे उद्घाटन”
Gondia ◼️स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक- 09/08/2023 पासुन सुरु होत असल्याने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सदर सोहळयाच्या निमित्याने राज्यात “माझी माती माझा देश” या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत कान्होली तर्फे जिल्हा परीषद कनिष्ठ शाळा कान्होली येथे उभारलेल्या शिलालेखाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थीत राहुन शिलालेखाचे उद्घाटन सपोनी पांढरे व ईतर मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात नक्षली हमल्या मध्ये शहीद झालेले शहीद पोउपनि दिपक सखाराम रहीले रा. कान्होली यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रमात पोउपनि शेख, पोउपनि पानसरे, पोलीस स्टाॅप, शाळेतील शिक्षक , विद्यार्थी मौजा कान्होली येथील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थीत होते.
“पंचप्रण शपथ ” हा कार्यक्रम जिल्हा परीषद हायस्कुल नवेगावबांध येथील प्रांगणात सपोनी संजय पांढरे,पोउपनि शेख ,तसेच शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी हातात माती घेवुन “माझी माती माझा देश” या कार्यक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.
सदरचे पंचप्रण शपथ कार्यक्रमात पोस्टे नवेगावबांध येथील पोलीस अधिकारी / अंमलदार व जिल्हा परीषद शाळा नवेगावबांध येथील मुख्याध्यापक करचाल सह शिक्षक वर्ग वर्ग 05 ते 12 वी पर्यंतचे मुले मुली मोठया संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.